प्रेम

Started by Dnyaneshwar Musale, April 30, 2017, 04:09:17 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

जवळी येतास तु
मी कावरी बावरी
दुरावती वाटा
मनास या सावरी.

ओढ दाटुन येते
रोज सकाळ सायंकाळी
स्वप्नात येतोस
शोधते मी  चंद्र आभाळी.

तुझ्यात गुंतत जावे
मी माझे मला
उगवता दिस तोच
मजला सोनेरी झाला.

काय नको रे मजला
सख्या तुजपाशी
जुळावी प्रेम नावाची
एकच राशी.