बाळाचा वाढदिवस

Started by Asu@16, April 30, 2017, 08:39:07 PM

Previous topic - Next topic

Asu@16

   बाळाचा वाढदिवस

बाळाच्या वाढदिवसाला
         कोण कोण आले ?
आई आली बाबा आले.
ताई आली, भाई आले,
          खूप खूप, खूप खूप
          ड्रेस घेऊन आले.
बाळाच्या वाढदिवसाला
          कोण कोण आले ?
मामी आली, मामा आले,
काकी आली, काका आले,
          खूप खूप, खूप खूप
          खेळ देऊन गेले.
बाळाच्या वाढदिवसाला
          कोण कोण आले ?
मावशी आली, मावसा आले,
आत्या आली मामा आले.
          खूप खूप, खूप खूप
          खाऊ देवून गेले.
बाळाच्या वाढदिवसाला
          कोण कोण आले ?
दादी आली, दादा आले,
नानी आली, नाना आले.
          खूप खूप, खूप खूप
          पप्पी घेऊन गेले.

- अरूण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita