स्वर्ग आला घरी

Started by Asu@16, April 30, 2017, 08:43:27 PM

Previous topic - Next topic

Asu@16

  स्वर्ग आला घरी

स्वर्गातलं फूल जेव्हा
जमिनीवर पडलं ,
त्याचंच आपलं बाळ झालं.
स्वर्गीय आनंद घेवून आलं
     घर झालं हॅपी हॅपी
     सॅड सॅड दूर झालं.
     दीदी वॉज मिसिंग हिम
     आता सारं किसिंग झालं.
काळजाचे तुकडे हे,
कसे करावे मोल ?
हिरे माणके पाचूहूनही,
रत्ने ही अनमोल !
      स्वर्ग आला घरी
      बोलू आनंदाचे बोल .
      आशिर्वाद देवू बाळाला ,
      देवू प्रेमाची ओल !
      देवू प्रेमाची ओल !!
             
- अरूण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita