कसं सांगू कशी बोलते !!

Started by कदम, April 30, 2017, 09:02:50 PM

Previous topic - Next topic

कदम


कसं सांगू कशी बोलते
कधी दुःखांना खळखळून हसवते
हसवता हसवता कधी रडवते
प्रकट भावनांना करत बोलते

न्यायासाठी धावा करते
उणीवांची जाणीव करते
अन्यायाचा धिक्कार ही करते
पृष्टावरून हृदयात उतरते

शब्द अलंकारांनी शृंगार करते
यमकाशी जुळवते नाते
स्वर साधण्या यती पण घेते
घर मनामध्ये करूनच राहते

बोलता बोलता चाल करते
ऐकणा-यांना स्तब्ध करते
कधी ओठातुन हळुच,तर
कधी कंठातुन टाहो फोडते

मनातल्या रहस्या दृश्य करते
कधी रडते कधी हसते
लाजत गाजवत काव्यपंक्तित बसते