शेवटी दुःखच पदरात पडलंय

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 01, 2017, 03:15:46 AM

Previous topic - Next topic
खूप प्रेम देऊन पण
आता मनच माझ तुटलंय
खूप धीट रहायचो मी
काय करू धैर्य माझं सुटलंय

खूप आनंदी होतो जीवनात मी
आता हृदय माझं कागदा गत फाटलंय
खूप तुकडे केलेस तू त्याचे
मी पुन्हा ते एकएक करून जोडलंय

प्रेमानं मला आपल्या
माणसांपासून तोडलंय
काय सांगू तिला याचं
काय घेणंदेणं पडलंय

काय माहित काय
तिच्या मनात दडलंय
माझं मन पण असं ना
ते तिच्या पाशीच येऊन अडलंय

काय करू माझं खर
प्रेम करणंच आज मला नडलंय
तिच्या प्रेमा खातर मला
घरच्यांनी आज घरा बाहेर धाडलंय

खर प्रेम करून देखील
शेवटी दुःखच पदरात पडलंय
या प्रेमानं मला माणसातुन
वेगळ करून एकटच पाडलंय

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर