महाराष्ट्र देशा

Started by कदम, May 01, 2017, 08:21:42 AM

Previous topic - Next topic

कदम


वंदनीय देश । पुजनिय देश ।
शक्तीशाली माझा । महाराष्ट्र ।।
वैतरणा काळ । पाताळगंगा ही ।
उल्हास गड । व्याप्तदेशा ।।
तोरणमाळ तो । पश्चिमेच्या घाटी ।
उत्तरी टेकडी । हनुमान ।।
ञंबकेश्वरी हा । कुंभमेळा भरे ।
आषाढी कार्तिकी । महोत्सवा ।।
सह्याद्री रांगेस । दख्खनी पठारा ।
शंभु महादेवा । प्रणामसो ।।
महात्मा ज्योतिबा । तुकोबा ज्ञानोबा ।
ज्ञानियांचा देश । महाराष्ट्र ।।
मराठी कोकणी । लावणी सम्राट ।
संस्कृती शोभे । महाराष्ट्रा ।।
परमप्रतापी । वीर शिवाजी ।
महाराष्ट्र देश । मावळ्यांचा ।।