प्रेमकथा

Started by कदम, May 02, 2017, 10:04:42 AM

Previous topic - Next topic

कदम

**********Updated**********


धागा धागा गुंफून नात्यांनी
विणली जाते प्रेमकथा

कोना कोना जिव्हाळ्याचा
व्यापुन घेते प्रेमकथा

वेगवेगळे छंद घेवूनी
घडते भावुक प्रेमकथा

ठावूक ना ते दोन जीवा
घर बांधलेले मना-मना

गाठी भेटीत धाग्यांच्या
गाठ मनाशी घट्ट बसते

लुभावते मग ऐकवताना
सर्वानाच प्रेमकथा !!


**********Updated**********

Sandhya Shamala Shinde

सुंदर ! प्रेम कथा सांगण्यासाठी प्रेम तरी करावं लागतं ...सुंदर ....!