आभास तुझा

Started by Rahul Ghorpade, May 02, 2017, 06:11:18 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

गुनगुनतो हा वारा आज काही
सांगतो कानात आज काही
चाहूल देतो त्या क्षणांची
जे होऊन गेलत काही...

डोळे गहिवरले
पाहून आज काही
ह्रदयात भाव दाटले
आठवून आज काही,

शांततेचा हा वारा
आज गुनगुनतो काही
आपल्या प्रेमाची जाणीव
ह्रदयात ठेवून गेला आज काही...

वाटत मनाला आज
विरहातील क्षण
विरत चाललेत आज काही,

स्पंदनांना ओढ तुझी
आज लागली काही
भावनांचा गोंधळ ह्रदयात
होत आहे आज काही...

भेट तुझी अन माझी
होईल का गं परत कधी
आयुष्यात माझ्या
तु घेऊनी प्रेम गंध
येशील का परत कधी....

♥....राहुल घोरपडे....♥