कसं सांगू मी तुला

Started by Devendra Parte, May 03, 2017, 08:06:23 AM

Previous topic - Next topic

Devendra Parte

कसं सांगू मी तुला,
माझ्यासाठी तू काय आहेस

रणरणत्या उन्हाळ्या नंतर आयुष्यात आलेली,
ती पावसाची पहिली सर तू आहेस
गडद अंधार असलेल्या या वाटेवर दिसणारी,
ती आशेची किरण तू आहेस
तू आस आहेस, तू ध्यास आहेस,
तू श्वास आहेस, तू आभास आहेस,
कसं सांगू मी तुला,
माझ्यासाठी तू काय आहेस
कसं सांगू .....

हसणं तुझं म्हणजे, लहर गुलाबी थंडीची
दिसणं तुझं म्हणजे, उमलती पाकळी गुलाबाची
माझ्या हसण्यात फक्त तूच आहेस,
माझ्या बोलण्यात फक्त तूच आहेस,
माझ्या स्वप्नात फक्त तूच आहेस,
माझ्या मनात फक्त तूच आहेस,
जातो जिथे, बघतो जिथे,
आता दिसतेस फक्त तूच तिथे,
कसं सांगू मी तुला
आहे तुझविन तर मी अधुरा इथे
कसं सांगू मी तुला,
माझ्यासाठी तू काय आहेस
कसं सांगू ......

            - देवेंद्र पार्टे