निर्धार !!!

Started by श्री. प्रकाश साळवी, May 03, 2017, 09:15:44 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

निर्धार !!
-------
वाटते आज वेदनेस पिऊन टाकावे
नशा धुंद आसवांस गिळून टाकावे
**
तुझ्या डोळ्यातल्या सागराच्या लाटा
बेधुंद होऊन वादळास संपऊन टाकावे
**
जिर्ण झालेल्या व्यथांना आज काय झाले ?
कैफात येउन वाटते पिरगळून टाकावे
**
काल मी जी पाहिली स्वप्ने मनाशी
एक एक स्वप्नास उधळून टाकावे
**
होतो उदास का तु रहा मनाशी ठाम
वाटते या मनाला चौखुर उधळून टाकावे
**
या वेदनेची बांधुन टाक तु तिरडी
वाटते या यशाला हुरळून टाकावे
**
कुणी म्हणावे हे गझल वा कविता
मात्र या यशाला गजरा माळून टाकावे
**
प्रकाश साळवी
२९-०४-२०१७