कृष्ण

Started by Kumar Sanjay, May 04, 2017, 02:35:29 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

कृष्णनभ किती सजलेले
जणू मोरपंख माळलेले
कांलीदीवर पसरून येते
शामरंग सावळे भारलेले


गोपिका रंगात भिजल्या
सावळ्या काठावर निजल्या
मोहक बासरीच्या सुराने
कृष्णगीत किती नटलेले

सांजसावळी गर्द मेघात
हळुवार सावळा मुरारी
प्रीतीवर अलवार उमटता
श्वासही सावळे झाले

कृष्णमय नाद उरलेला
कायेने कृष्ण स्पर्श जगलेला
तरी अोंजळीत उरले
प्राजक्त शेवटचे सुकलेले

# कुमार संजय

7709826774