मृगजळा परी प्रीत ही

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 06, 2017, 01:35:30 AM

Previous topic - Next topic
तोडलीस तू प्रेमाची
शपथ कर मोकळे तू
आता कोंडलेलेे श्वास माझे
आसवांनी पेटले आता
जीवनाचे  रान माझे
गेले ते दिवस आता
ती सुखाची रात ही लोटली
काळजाची ती दोर
तुझ्या माझ्या प्रेमाची
आता कशी गं तुटली
प्रेमाची ती घट्ट गाठ
कशी गं अशी आता सुटली
तू कारण नसताना
माझ्यावर कशी गं रुसली
मृगजळा परी प्रीत ही
कशी गं अधुरीच मला भेटली
माझी नेहमीच सोबत मागणारी तू
Please leave me alone
बोलून कायमची सोबत माझी सोडली

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर