स्मारके (गझल)

Started by शिवाजी सांगळे, May 06, 2017, 07:11:42 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्मारके (गझल)

मौनात गोठल्या त्या सार्‍याच आठवांची
बांधेन स्मारके मी माझ्याच आसवांची

डोळ्यांत सांधलेली खोडू कशी कहानी
शिल्पात स्मारकांच्या तूलाच पाहण्याची

भोळ्याच भावनांचा मांडून तो पसारा
खोटीच ठेवली मी आशा ग शोधण्याची

प्रीतीच श्वास होता दोघात ना सखे तो
ठेऊन याद गेला त्या रेशमी सुखाची

चाहूल लावते ती जीवास ओढ भारी
स्पर्शात भोगलेल्या स्वप्नील भावनांची

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९