मनसुबे

Started by कदम, May 07, 2017, 01:25:32 PM

Previous topic - Next topic

कदम

**********Updated**********

शोध घेता मनसुब्यांचा
ठाव त्यांचे कोप-यांनी
ठिकाण एकमेव मनांबरी
स्वप्नांचे एक घर मनात चंदेरी

ध्येय अंतिम लाभे ना कोठे
रात्रीच्या काळोखी मोठे
भोळे मन माझे धावु लागे
जोडण्या स्वप्नांचे वास्तवाशी धागे

स्वप्नातले गुज गवसते
जागे होताच होता पहाट
धागा धागा विणतो हळुवार
येते स्वप्न तोवर घेवुन दुसरी पहाट


**********Updated**********