आठवणीतील माझ्या ती

Started by Rahul Ghorpade, May 07, 2017, 08:31:21 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

अनोळखी या
वाटेवर चालत असताना
मला ओळखीची
वाटणारी एक
वा-याची झुळूक
हळूचं स्पर्शून गेली अंगाला...

तुच आहेस ती
असं वाटत होत मला
आता प्रत्येक क्षणाला,

फक्त भासचं
असतात माझे असे
नंतर कळलं मला
ठेच लागल्यावर पायाला...

♥....राहुल घोरपडे....♥