मन

Started by Asu@16, May 08, 2017, 12:29:19 AM

Previous topic - Next topic

Asu@16

         मन

नाही शेंडा, नाही बुडखा
होता वृक्ष अंबरी
आदी नाही, अंत नाही
युगायुगाचा संतरी
वर्षासमयी कधी भिजली
हिरवी साडी चिंब ओली
प्रणयाचा कधी बहर येता
फुलते प्रीत गालोगाली
शिशिर जाऊनी वसंत येता
कोकीळ गाई मंजुळ गाणी
तृषार्त होऊनी ग्रीष्म समयी
रडते हिरवळ उजाड रानी
पक्षी येती, पक्षी जाती
कधी विसावती क्षणभरी
काडी काडी जमवून कधी
बांधती घरटे अधांतरी
कुणी नांदती, कुणी भांडती
कुणी निर्मिती नवीन पिढी
आकाशीचा वृक्ष तेव्हढा
सळसळ करुनी आत कुढी

- अरूण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita