पहिले पाऊल

Started by Asu@16, May 08, 2017, 12:32:58 AM

Previous topic - Next topic

Asu@16

      पहिले पाऊल

दुडू दुडू, दुडू दुडू शैशव आले
आज टाकीत पाऊल पहिले
हासत चालत डोलत आले
पायी वाजती घुंगुरवाळे
रामकृष्ण की शिवराय हा
किंवा घडू दे भीमराय हा
पाऊल पुढचे पुढे पडू दे
यश शिखरे अनंत चढू दे
आशिर्वाद तुज चिमण्या बाळा
फुलव जगती आनंदमळा
सुखसमृद्धी, आरोग्य मिळे
तव आयुष्यमानही भले
हेच मागणे तया वाहिले
आज टाकिता पाऊल पहिले

- अरूण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita