मन

Started by vaishali2112, January 25, 2010, 12:15:42 AM

Previous topic - Next topic

vaishali2112

एका मनात कितीही 'मन' असले,
तरीही 'मन' भरत नाही.
'मनात' मन असले,
तरीही 'मन' जगू शकत नाही.
मनातल्या मनात जे 'मन' असते,
शेवटपर्यंत कुणाचे असते, हेच मनाला कळत नाही.
:-\
मन 'मनाला' समजावते पण......
तिसरच 'मन' मनात आढळते.
कुठलं 'मन' आगीत वितळते,
हेच मनाला कळत नाही.   
:-[
मन 'मनाचे' गाणे गाते, पण......
'मनाचे' गाणे, मन गाते की,
गाणे मनाचे, 'मन गाते',
हेच कळत नाही मनाला !
::)
मनातल्या 'मनात'.......
विचार चालू असतो 'मनाचा',
पण, इतक्या मनातून,
नेमक्या कुठल्या 'मनाचा' विचार करावा,
हेच कळत नाही मनाला.
:o
मनाला तर काहीच कळत नाही,
तर 'मन' मनात का असतं?
हे 'मन', नेमकं वेडं की शहाणं?
हेच कळत नाही मनाला. 
:(
मनाला सर्व काही समजून सुद्धा,
काहीच कसं कळत नाही मनाला?
नेमकं, ह्या मनाला कुठल्या 'मनाची' गरज असते?
'मनाची' गरज भासायला,
मनातले 'मन' असते तरी कुठे?
>:(
मनालाच माहिती; 'मन' कुठे लपलय ते?
म्हणूनच मन 'मनाला' विचारते,
"तुझ्या मनात आहे तरी काय?"
हे सुद्धा 'मनच' विचारतंय मनाला,
पण हे सुद्धा कळत नाही मनाला !!!
:-X :-X :-X

वैशाली................ :)




amoul

"तुझ्या मनात आहे तरी काय?"

hich pratekachi vedana aahe
khoopach chhan kavita aahe!!

santoshi.world

maza man hi asach ahe ............... chhan ahe kavita ........... tuzi ahe ka? ....... khali kaviche nav dile nahi ahe so kalat nahi ahe tuzi ahe ki dusaryachi te ....... tuzi asel tar tuze nav tak khali otherwise author unknown tak :) ....

vaishali2112

ho mazich ahe.....thank you.

astroswati


gaurig

mastach...........keep it up

एका मनात कितीही 'मन' असले,
तरीही 'मन' भरत नाही.
'मनात' मन असले,
तरीही 'मन' जगू शकत नाही.
मनातल्या मनात जे 'मन' असते,
शेवटपर्यंत कुणाचे असते, हेच मनाला कळत नाही.
:) ;) :) ;)

Parmita

मनालाच माहिती; 'मन' कुठे लपलय ते?
म्हणूनच मन 'मनाला' विचारते,
"तुझ्या मनात आहे तरी काय?"
हे सुद्धा 'मनच' विचारतंय मनाला,
पण हे सुद्धा कळत नाही मनाला !!!
:-X :-X :-X mastach