असं काही नाही

Started by Rahul Ghorpade, May 09, 2017, 06:23:22 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

माझ्याकडे तिचा नंबर
नाही असं ही नाही
बस तिच्याशी आता बोलण्याची
माझ्या हिम्मत नाही...

ती कुठे राहते हे मला माहीत
नाही असं ही नाही
बस तिच्यासमोर जाण्याची
आता माझ्यात हिम्मत नाही...

तीचं काॅलेज कुठं आहे
हे मला माहीत नाही
असं ही नाही
बस तिला दुस-या
सोबत पाहण्याची
आता माझ्या हिम्मत नाही...

तीचं आता
माझ्यावर प्रेम नाही
हे मला माहीत नाही
असं ही नाही
बस माझं तिच्यावर
आजही खूप प्रेम आहे
हे आता तिला माहीत नाही...

♥....राहुल घोरपडे....♥