तू कूठेही असलीस

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 10, 2017, 11:24:43 AM

Previous topic - Next topic
तू कूठेही असलीस
तरी माझ्या जवळ आहे
तू कशीही असलीस
तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी
तुझा असून देखील तुला
माझ्या प्रेमाची किंमत नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या
विचारात फ़क्त तूच आहे
एक सत्य आहॆ मी
तूझ्याशीवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला
ते समजावू शकत नाही
मी जगतोय आजही
एक युद्ध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहे
तू मला प्रेमात हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण
तूच बोलत नाहीस
मी आजही जागा आहे
तुझ्यासाठी कारणं तू झोपलीस
मला दुःख नाही की तू माझी नाहीस
मला दुःख आहे याचं कि
तू मला हरण्यासाठी
माझ्या भावनेशी खेळलीस
आज मी जरी हरलो
पण तू तरी  कुठं जिकंलीस

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर