माझी ती

Started by Rahul Ghorpade, May 10, 2017, 07:29:55 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

घेता श्वास मज आठवते ती
उघडता डोळे मज दिसती ती
टाकता पाऊल मज भासते ती
येऊन आठवणीत रोज मज छळते ती...

रोज रोज आता मज आवठते ती
स्मृतीत माझ्या नेहमी असते ती
डोळ्यांतल्या अश्रुंत आता असते ती
ओठांतुनी शब्द होऊन येते ती...

ह्रदयातल्या स्पंदनांसारखी
माझ्यातचं असते ती
मंद वा-यांत वाहते ती
प्रत्येक क्षणी श्वासांत दरवळते ती
सावली सारखी माझ्यासोबत असते ती
भावनांना माझ्या शब्दांत उतरवते ती...

माझ्या कवितेतली ती
माझ्या कवितेचा अर्थ ती
माझ्या शब्दांचा भाव ती
मला लिहीण्यासाठी प्रेरणा देणारी फक्त ती..

♥....राहुल घोरपडे....♥