काही बोलायचे होते...

Started by Rupesh Gade, May 10, 2017, 11:46:07 PM

Previous topic - Next topic

Rupesh Gade

एक गुपित आज खोलायचे होते आणि तुमच्या बद्दल भरपूर काही बोलायचे होते, त्यावेळी नाही बोलो काही कारण शब्द कंठात गोठले होते, आणि घट्ट मुठीत मी स्वतःला रोखले होते। वर्ष, महिने, दिवस तुमच्या सोबत कसे गेले कळले नाही, आणि पाऊल देखील आज घराच्या दिशेने वळले नाही, तुमच्या सोबत मस्ती, भांडन, मस्करी खूप केल्या आणि त्याच आठवणी हृदयात घर करून गेल्या, कोणी आपुलकीने समजावले तर कोणी रागाचा धाक दिला, पण कधी तिरस्कार कोणी नाही केला, मला माहित आहे, उद्या मी तुमच्या मध्ये नसेल, पण तुमच्या मैत्रीच्या यादीत माझे नाव ठळक पणे दिसेल, तुमची हि मैत्री जीवनभर अशीच राहू द्या, आणि मस्करीत कोणाला दुखवले असेल तर राग नका धरू, जाऊ दया।
             
                                              -रुपेश मारुती गाडे

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]