कविता

Started by Rahul Ghorpade, May 12, 2017, 12:14:57 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

कवितातल्या प्रत्येक शब्दांत
आता मी मलाचं उतरवतो
तु वाचशील कधीतरी म्हणून
मी कवितांत मलाचं रमवतो

कवितातल्या प्रत्येक शब्दांत
मी माझं आता प्रेम मांडतो
पाहशील कधीतरी तु कविता माझी
म्हणून मी कवितांत जावून लपतो

कवितातल्या प्रत्येक शब्दांत
मी आता माझ्या भावना लिहीतो
कधीतरी घेशील तु समजून मला
म्हणून मी आता कविता लिहीतो...

आवडन का नाही तुला कधी
कविता माझी माहीत नाही गं मला
पण खरचं मनापासून आणी
अगदी मनातलं लिहीतो...

♡...राहुल घोरपडे...♡

MANGESH GAVANANG


Sarang_Shende_Wardha

खूपच मस्त :exclaim: