ओठांवर तुला सजवावं वाटतं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 13, 2017, 06:44:36 AM

Previous topic - Next topic
ओठांवर तुला सजवावं वाटतं
नजरेत तुला पहावं वाटतं
चालता चालता फक्त
तुझं नावं घ्यावं वाटतं

तुझ्या मिठीत येऊन
मन मोकळं रडावं वाटतं
रडतांना अश्रूंचा प्रत्येक
थेंबाचा मोती व्हावा वाटतं

मी आठवलं तुला पण आता
तुला माझी आठवण यावी वाटतं
खूप रडलो आठवणीत तुझ्या
आता अश्रूंची काय किंमत
असते तुला दाखवावं वाटतं

अंधकार मय जीवन झालं
तुझ्या विना प्रकाशासाठी
आठवणींचं घर जाळाव वाटतं

शेवटची गुचकी पण तू
गेल्यावर यावी वाटतं
माझं मरण पण तुझ्यासाठी
कविता लिहतांना यावं वाटतं

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर