डोळे

Started by Rahul Ghorpade, May 13, 2017, 01:24:56 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

ती समोर आली की
माझे शब्दचं जणू गोठतात
ओठावर येऊन सुद्धा
परत ह्रदयात परतात...

बोलायचं खूप असतं मला तिच्याशी
पण ओठ माझे अबोला धरतात
मनातले भाव माझे
डोळ्यांनी व्यक्त होतात...

पाहतचं राहतो मी डोळ्यांत तिच्या
कारण डोळे तिचे खूप बोलतात
पाहत राहतो आम्ही एकमेकांना
आणी डोळे आमचे एकमेकांशी बोलतात...

माझ्यासाठी असलेलं प्रेम मला
डोळ्यांत तिच्या दिसतं
ह्रदयातलं गुपीत तिच्या मग
डोळ्यांनीचं रिक्त होत...

♡...राहुल घोरपडे...♡