आई

Started by Devendra Parte, May 14, 2017, 09:17:12 AM

Previous topic - Next topic

Devendra Parte

आईसाठी काय लिहू
आईसाठी कसं लिहू
आईसाठी पुरतील एवढे शब्दच नाहित कुठे
आईवरती लिहिण्यैतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

'आई' ..... म्हणजे नक्की काय ?
जीवन हे शेत, तर आई म्हणजे विहिर
जीवन हे नौका, तर आई म्हणजे तीर
जीवन हे शाळा, तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम, तर आई म्हणजे सूट्टी

'आई' ..... म्हणजे नक्की काय ?
आई तू उन्हातली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता कितीही अडचणी येऊ खुशाल

'आई' ..... म्हणजे नक्की काय ?
हे कुणीही सांगू शकणार नाही
पण तरीही मला वाटते
'आई' म्हणजे आपल्या मुलाला
या जगात तूच सर्वश्रेष्ठ आहेस
असा आत्मविश्वास देणारी
एक.....महान.....प्रेमळ व्यक्ति असते
'आई'.....'आईच'.....असते

         - देवेंद्र पार्टे

vijaya kelkar

उत्तम ,मातृदेवो भव ,मातृदिनाच्या शुभेच्छा