'आई'...

Started by suraj-123, May 14, 2017, 03:42:12 PM

Previous topic - Next topic

suraj-123


आईने खुप काही दिले.
माझ्यासाठी नऊ महीण्याच्या,
वेदनांचे घाव तीने साेसळे.
छातीशी कवटाळुन घेऊन,
दुध मला पाजले.
तळहाताच्या फाेडाप्रमाने,
मला खुप तिने जपले.
झळ ऊन्हाची लागु नये,
म्हणुन पदराला छप्पर बनवले.
रागात कधी मारले तर,
पुन्हा मायेने जवळ घेतले.
खुप कष्टाने मला,
लहानाचे माेठे केले.
तिच्याबद्दल लीहायला,
आज थाेडे घेतले.
गुनगान इतके आहे तिचे की,
शब्दचं अपुरे पडले.
मायेचा तिचा झरा,
कधीही न आटणारा.
प्रत्येकाला नेहमी,
हवाहवासा वाटणारा.

-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात...
(ता.-मुरबाड,जि-ठाणे)

https://kavyasakhadnyaneshwarthorat.blogspot.com