आई

Started by Rahul Ghorpade, May 14, 2017, 07:34:50 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

सगळ्यांनी आई विषयी लिहील
आज खूप छान लिहीलं
आणी मला ते खूप आवडलं
पण त्यांच काय हो जांची आई नाही
माझ्या त्या मित्र मैत्रीणींसाठी खालील चारोळी
तुमचं दुखः तर नाही लिहू शकत मी शब्दांत
पण तुमच्यासाठी माझ्या ह्या चारोळी....

आई गं आई तु का
केली जायची घाई
लेकरू तुझं गं आता
तुझी खूप वाट पाही...

रोज दमून येता घरला मी
आई तुझी आठवण होई
दमला का पाणी देऊ का
कोण नाई गं विचारी...

डोळे ओलावतात गं आता
जेव्हा तुझी आठवण होई
आई गं आई तु का
केली जायची घाई
लेकरू तुझं गं आता
तुझी खूप वाट पाही...

...आई तु माझी आई...

♡...राहुल घोरपडे...♡