आईचे प्रेम सारखेच सर्वांवर

Started by कदम, May 14, 2017, 08:08:13 PM

Previous topic - Next topic

कदम


काळिज जिचे लेकरांसाठी
आयुष्य तिचे पोरांसाठी
झिजवते देह संसारासाठी
निस्वार्थ माया बाळांसाठी

उर्जेचा कोष वासरांसाठी
आई लाभली एक जीवनासाठी
अश्रु वाहते कधी लाडक्यासाठी
अंगाई गाते गोड गोड स्वप्नांसाठी

हात विस्तवावर तिचं
भुकेलं पोट जेंव्हा लेकराचं
ज्ञान ईश्वरीच असतं आईचं
हसणारं थाप ऐकुन लेकरांचं

घालते पांघरून चुकांवर
घाव जाणेना करणं काळजावर
लेकरू लहान असो वा थोर
आईचे प्रेम सारखेच सर्वांवर