उगीच कशाला ञास तुला..!!

Started by कदम, May 15, 2017, 01:07:17 AM

Previous topic - Next topic

कदम


वेडा म्हण मला
म्हण तू लबाड
काय नावे हवी
ती दे मज नवी....!!

घेवुन माझे शील
सुखाने जगशील
पुन्हा नाही मिळणे
माझे पंचशील..!!

घोट गळा सुखांचा
उखड मळा मनाचा
पिवून टाक थेंब
थेंब विरक्त रक्ताचा..!!

मार टोमणे आज मज
समजून शिरीचा ताप
लागेल पूण्य आज मज
फिटेल जन्माचे पाप..!!

प्रित जरी अस्सली
माणूस म्या नकली
विकून सा-या अकली
फेकून टाक बगली..!!

कर दृष्टी वक्र
घे अशी घिरकी
देवून मग फिरकी
काढ माझी लायकी..!!

तोंडचे दुःख राहो
ना काही मुखी
काढून माझी चूकी
खाकरून कर थुंकी..!!

वेडा म्हण मला
उगीच कशाला ञास तुला..!!