गुरूच्या कविता..

Started by Balaji lakhane, May 15, 2017, 06:19:04 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

आठवते का सये तुला,
गेल्या पावसाळ्याची गोष्ट!
सये आपण तेव्हाच तर,
बनलो होतो ना गं दोस्त.!

रिमझिम रिमझिम करत,
आल्या होत्या ना गं सरी.!
गुलाबी प्रेमाच्या पावसात
नाचत होती ना गं परी.!

अंगावर उडवते होती पाणी
गात होती पावसाची गाणी.!
त्या सुसाट्याच्या वाऱ्याला
घाबरली होती ना गं राणी.!

प्रेमाच्या रिमझिम पावसात,
सये तू झाली होतीस ओली.!
पाहत होतीस मला आणि,
मिटली तुझ्या ओठाची लाली.!

पावसाच्या पाण्याने सये तुझं,
सौंर्दय उज्ळल होत मस्त.!
मी पाहत होतो आणि तुला, 
मनात साठवत होतो फक्त.!

हळू हळू तुलाच बघत मी
जवळ आलो होतो तुझ्या.!
तुला पावसात बोलताना
ह्रदयात धडधडत होत माझ्या.!

तेव्हाच तर पावसात आपण
दोघे बनलो ना गं पक्के .!
त्या मुळेच तर होतात प्रिये
अाता प्रेम कविता किती मस्त.!

©बालाजी लखने(गुरू)
     उदगीर जिल्हा लातूर
     भ्र...८८८८५२७३०४