बालपणीचा खेळ रं गड्या

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 15, 2017, 06:18:55 PM

Previous topic - Next topic
बालपणीचा खेळ रं गड्या
पुन्हा तू खेळ गड्या
तेच ते जुने क्षण अन
तेच जुने सवंगडी

आठवणींच ते गाठोड
पुन्हा तू खोल रं गड्या
पुन्हा खेळू आपण
तो लपंडावाचा तो खेळ


सायकलीच चाक चकार रं गड्या
पुन्हा खेळू तो मैत्रीचा खेळ
सुदामा सारखा सखा तू माझा
पुन्हा होऊ दे मैत्रीचा तो मेळ

चुलीतली फळी क्रिकेटची ती bat
रुमलाचा तो ball खेळू चल
रं गड्या क्रिकेटचा तो खेळ

लाकडाचा विटी दांडू अन
काचेच्या त्या गोट्या तो
पुन्हा रिंगणाचा खेळ खेळू रं गड्या
रंगून दे आता तो पुन्हा बालपणीचा खेळ

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर