हसायचे होते (हँसने की चाह ने वर बेतलेली कविता )

Started by विक्रांत, May 15, 2017, 11:20:03 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



फार काही नाही मज
फक्त हसायचे होते 
हेच वेड पण मला
रडावया पुरे होते 

साथ शोधावया गेलो
सोडणे नशिबी आले 
कुणी साथी नाही तर
दु:ख हेच दोस्त झाले

आता तर जीवनाला
मी ही विसरून गेलो
सरतात दिस कसे
निर्जीवात जमा झालो

कळेना प्रिय कुणास
दु:ख माझे होत आहे
दूरच्या त्या तारकांत
मन हरवत आहे

चालतो आहेच इथे 
छिन्नभिन्न स्वप्न जरी
निसटून मिठीतून
गेले आहे कुणीतरी

कळेना हूल कुणाची
जळते काय अंतरी 
हसतेय कोण इथे
काळ ओठात जहरी

(हँसने की चाह ने वर बेतलेली कविता )



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in