आजी

Started by कदम, May 16, 2017, 10:37:02 AM

Previous topic - Next topic

कदम


वाहिली डोईवर टोपली
बाप-चुलत्यासाठी राबली
गावभर नाती तिनं जपली
कसून कंबर लेकरं पोसली

खुप दुःख जीवनात सोसले
घर शेवटपर्यंत जपले
दगड डोईवर वाहिले
पाझर दगडातुन फोडले

झगडण्यास नाव जीवन दिले
सुख-दुःख खुप तिने पाहिले
कधी संसारास नाही कोसले
ना कधी प्रपंच्यास सोडले

जरी पांगली पोटची पोरं
हिम्मतीनं नाही मानली हार
येती तिज पाशी घेवून माघार
आईचा धावा करी बाप लेकरांचा चार

आजीची माया बापावर फार
आजीचे खुप बापावर संस्कार
आईचीही आई झाली थोर
आजी तुझे खुप अम्हावर उपकार