दोष

Started by कदम, May 16, 2017, 12:05:41 PM

Previous topic - Next topic

कदम


जरी समीप नसली
ती माझ्या मनात ठसली
भेटली एकदा कोप-यावर
कायमची काळजात वसली

पाहुन एकदा गोड हसली
दुखावली एकवेळ अशी कि
कायमची माझ्यावर रूसली
भेट कोप-यावरची  मुकली

पाहते अंत माझ्या प्रेमाचा
वाढतो पारा तिच्या रोषाचा
दोष ना तिच्या प्रेमळ मनाचा
दोष माझ्या धुंद स्वैराचाराचा