एक दिवस

Started by Rahul Ghorpade, May 16, 2017, 08:17:19 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

असाचं धर घट्ट हात तु माझा
कधीचं सोडू नकोस हात तु माझा
डोळ्यांत अश्रु तरळतात गं माझ्या
जेव्हा नसतो मला सहवास तुझा...

डोळ्यासमोर रहा तु आता आयुष्यभर माझ्या
प्रत्येक क्षणी हवीस तु आता जवळ माझ्या
विरहात तुझ्या जळतो गं जीव माझा
तरफडणा-या माझ्या ह्रदयाला दे तु सहारा...

वाटेवरी उभा राहून पाहतो मी वाट तुझी
येशील एकदातरी तु अन
पाहशील मला अशी आस माझी
गुपचूप आणी लपून राहतो
मी आता त्या निरागस वाटेवरी...

नेहमी असतो मी त्या शब्दांच्या शोधांत
जात लिहू शकल मी प्रेमाला माझ्या
स्पर्श करायचा मला ह्रदयाला
तुझ्या आता शब्दांनी माझ्या
आणी ते शब्द शोधून एक
दिवस दाखवलं मी तुला बग तु आता...

♡...राहुल घोरपडे...♡