किनारे

Started by शिवाजी सांगळे, May 17, 2017, 04:33:48 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

किनारे

फुलुन जाती कधी येथले
सारेच ते नदि किनारे
प्रेम कुजन चाले कोठे
कुठे निरोपा जमती सारे

वाहतो कुठवर सुख-दुःखे
कळेना, हा नदि किनारा
रात्रं दिवस मुकांध पणे
उरे साक्षिदार हा बिचारा

निशब्द, अलिप्त राहावे
कसे जमते यांसी कळेना
तोडावे हे सख्य म्हणता
काहीच केल्या ते तुटेना

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९