हृदयाला खूप आस होती तुझ्या प्रेमाची

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 18, 2017, 10:38:01 AM

Previous topic - Next topic
हृदयाला खूप आस
होती तुझ्या प्रेमाची
हृदयाची या तू प्रेमानं
तहान मिटवली नाही

आकाशा सुद्धा असं कसं
वागलं माझ्याशी त्याच्या
सावलीची सोबत होती
मला आता ती सुद्धा राहिली नाही

तुझं माझ्यावर रुसण्याचं
कारण मला अजून कळलं नाही
खूप दिवस झाले आता तू
मला त्रास सुद्धा दिला नाही

रोजचं येतं होतो दरवाज्यावर
तुझ्या आवाज देण्या पण
एव्हड्या दिवसात तू एकदा सुद्धा
प्रेमानं जवळ बोलवलं नाही

रोजचं अंत्ययात्रा निघू
लागली दारातून तुझ्या
या अर्धमेल्या शरीराची
एकदा सुद्धा तू प्रेमानं
फुल त्यावर टाकलं नाही

लोक पण बोलू लागले
आता बस कर प्रेमवेड्या
तुझं प्रेम तिच्यावर आहे
पण ते तिला कधीचं जानवल नाही

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर