माझ्या मनातील भावना

Started by Rahul Ghorpade, May 18, 2017, 09:13:48 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

♡..माझ्या मनातील भावना..♡

भिती वाटते गं तुझ्याशी बोलण्याची
बोलताना डोळ्यात तुझ्या बघण्याची
बघताना चेह-यावरचे भाव तुझे पाहण्याची
पाहताना तुला मी तु मला पाहण्याची
मनात असलेला भावनांना
तुझ्यासमोर मांडण्याची
सवय लागली मला आता
चोरून तुला पाहण्याची
मैत्रीणींशी गप्पा तु मारताना
तुला गुपचूप लपून बघण्याची
खूप प्रेम करतो तुझ्यावर हे तुला सांगण्याची
भिती वाटते गं तुझ्याशी बोलण्याची...

♥...राहुल घोरपडे...♥