==* संगी तुझ्या उभा रे *==

Started by SHASHIKANT SHANDILE, May 19, 2017, 05:36:53 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

संगी तुझ्या उभा रे दुःखात कोण आहे
उगीचाच तू मरतो फासाचे मौन आहे
मरून तुझे कर्ज फेडून झाले का सारे
रस्त्यावर उभे घरचे आधार कोण आहे

उन्हात का अशी रे ती बायको राबते
मुलं झोपली उपाशी अन्नाचे मौन आहे
पांघरून तुझे स्वप्न शासन हे निजलेले
रडले शेत सारे सावराया कोण आहे

मानू नको चुकीचे भास दुःख संपल्याचे
दुखास रडू आले नी ढगाचे मौन आहे
लपलारे बळीराजा जाऊन शोध त्याला
प्रश्नांना तुझ्या रे रोखणार कोण आहे

ओरडाया ढोंग झाले हे दुःख आवरेना
समाज फक्त बोले खिशास मौन आहे
सोडुनिया तू गेला तो फास का असा रे
येणार तुझ्या मागे अजुन कोण आहे

सोडुनिया तू गेला तो फास का असा रे
येणार तुझ्या मागे अजुन कोण आहे
--------------------//**--
शशिकांत पुरुषोत्तम शांडिले,
राहणार - टाकळी (भंसाळी)
तह - सावनेर जिल्हा - नागपुर
भ्रमणध्वनी क्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!