मी

Started by smadye, May 19, 2017, 08:08:42 PM

Previous topic - Next topic

smadye

      मी

मी म्हणजे कोण आहे
हे गणित मजसी नाही सुटे
कधी होतो हर्ष कधी असते उदास
का हा भावनेचा लपंडाव हे न कळे मज

कधी वाटे उंच घ्यावी भरारी
कधी वाट अडखळे पाऊलात
कधी डोंगर माथ्यावर आत्मविश्वास
कधी निराशेचा घोर अंधार

असे का होत असते
माझेच मला न कळे
पण उदासीच्या ढगाआडूनी
प्रकाशाकडे मन उडे

हे असे होते का माझ्याशी?
का हे कोडे असते सगळ्यांचे?
नैराश्याच्या वाऱ्याकडूनि
मन वळे उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याकडे

सौ सुप्रिया समीर मडये
madyesupriya@gmail.com