तो आणि ती

Started by Vaishnavi Adkhale, May 19, 2017, 09:42:43 PM

Previous topic - Next topic

Vaishnavi Adkhale

तो थोडा असा , ती थोडी तशी ;
की मग ,
ती थोडी अशी आणि तो थोडा तसा...

कोण कसं आहे , हे काही कळत नाही ;
पण एकमेकांशीवाय दोघांचा दिवसही सरत नाही...

तो थोडा प्रेमळ , पण ती थोडी रागिट ;
तो तसा शांत , पण ती जरा खोडकर ;
तो ऐकतो सारे काही , ती बोलते खूप काही ;
त्याचा जेवढा विश्वास तिच्यावर ,
तेवढेच तिचे प्रेम त्याच्यावर...

ऐवढ सारं असूनही ,
एकमेकांशिवाय करमत नाही ;
अनेकदा वाद झाले , तरी प्रेम मात्र मावळत नाही...

कोण कसं आहे , हे काही कळत नाही ;
पण एकमेकांशीवाय दोघांचा दिवसही सरत नाही...

VaishuA.