सजली ती लेक आता

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 20, 2017, 06:27:00 AM

Previous topic - Next topic
सजली ती लेक आता
परक्या घरी जाण्यासाठी
शेवटचा तो क्षण होता
जेव्हा लेक निघाली
बापाच्या गळा भेटीसाठी

आयुष्याशी ती सोबत लेकीची
एक दिवसात संपली कशी
माय तुळशीला पदर डोक्यावर घेऊनी
पाणी घालता अश्रू ढाळते कशी

शेवटची लग्न घटिका येता समीप
मनी हुंदका भावाच्या दाटून  येई
बहिण आपुली आता नात भावाचं
एक दिवसात आता सोडून जाई

दिल्या घरी सुखी राहील लेक
आता हिचं बापाची इच्छा होती
आनंदाचा क्षण असतो सर्वत्र
पण बापाच्या मनी हुंडा देण्यासाठी
पैशाची जुळवा जुळव चालू होती

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर