भक्ति कविता

Started by कदम, May 20, 2017, 08:45:13 AM

Previous topic - Next topic

कदम

आहे तरी कुठे । नाव ज्याचं विठु ।
पांडुरंग सदा । भक्तां मुखी ।।
चंद्रभागे तिरी । मंदिरी गाभारी ।

असा कसा हरी । प्रकटेना ।।
माऊली माऊली । करतो मी जरी ।
हाक माझी तुला । ऐकवेना ।।
दुरावा भक्तांसी । सोसवेना काही ।
अदृश राहूनी । अंत पाही ।।
शोधती विठ्ठला । दिशी दाही तुला ।
नित्य तिन्ही लोकी । दर्शनार्थी ।।