तू नेहमी बोलायची जरा समजून घे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 20, 2017, 08:48:36 PM

Previous topic - Next topic
तू नेहमी बोलायची
जरा समजून घे
अन मी पण समजून घेतलं
तू कुठं मला उमजून घेतलं

मला तुझ्या बोलण्याचा
उद्देश कळला नव्हता
मला सोडून जाण्याचा
त्या तुझ्या शब्दातील अर्थ होता

प्रेमात एव्हडा आंधळा झालो
खोट्या प्रेमाचं नाटक कळलं नाही
समजून घे याचा अर्थ खोटं प्रेम होतो
मला कधीच जाणवलं नाही

तू सोडून गेली मला
भाव समज या शब्दाचा
आजही अर्थ लागला नाही
तुझ्या अशा वागण्याचा..

खऱ्या प्रेमाची जाणीव
तुला कधी झालीच नाही
असो तू कधी खर प्रेम केलंच नाही
म्हणून तुला प्रेमाचा अर्थ कळला नाही


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर