कॅबरेवाली

Started by Asu@16, May 21, 2017, 07:24:51 PM

Previous topic - Next topic

Asu@16

    कॅबरेवाली

डमडमरु घुमे मदनाचा
कामांगी नाचत आली
फडफडाड उठले डोळे
ज्वानीला भरती आली
कटीवर विटीभर चिंधी
वस्त्रांची नाही मिंधी
वक्षी खुल्ले मांस
डोळ्यात विखारी आंस
बेधुंद करी मतीमंद
सळसळती काळ नागीण
सर्वांगी लचके तोडी
हिंस्त्र, क्रूर वाघीण
नाचत अशी ही आली
जशी कंबर हिची मुरगळली
प्राशुनि सुरा बरगळली
ही तर कॅबरेवाली.

- अरूण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita