बायको

Started by Asu@16, May 21, 2017, 07:31:35 PM

Previous topic - Next topic

Asu@16

        बायको

बायको बायको असते कशी
भाजीमधल्या मीठासारखी
असते तेव्हा न जाणवणारी
अन् नसते तेव्हा जाणवणारी

बायको बायको असते कशी
दुधामधल्या साईसारखी
निरशा दुधात विरघळलेली
अन् ताप (संकट) देता वर येणारी

बायको बायको असते कशी
सागरामधल्या हिमनगासारखी
नऊ भाग न समजणारी
अन् एकच भाग समजणारी

बायको बायको असते कशी
देहूच्या तुक्यासारखी
फुकटामध्ये प्रेम देणारी
अन् विकतामध्ये दुःख घेणारी

बायको बायको असते कशी
आयुष्यात देवासारखी
सुखामध्ये न आठवणारी
अन् दुःखामध्ये आठवणारी
              बायको बायको असते कशी
              संसाराचा परीस जशी !

- अरूण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita