भक्ति कविता

Started by कदम, May 22, 2017, 11:31:56 AM

Previous topic - Next topic

कदम


धीर कसा असे । दुर कसा राही ।
अधीर दर्शना । देवा तुझ्या ।।
नयन अतुर । हृदय फितुर ।
असे ऐसी गोडी । नामा तुझ्या ।।
होतसे  दुःखही । हरवता  सौख्य ।
तुझे भगवंता। नाम मुखी ।।
कर जुळवुनी । देवास वंदिती ।
मंदिरी राऊळी । शोधी तुला ।।
देवुनी दर्शन । तुझ्या भक्तिरसा ।
भगवंता भक्ती । उद्धारशी ।।