गणपयी बाप्पा

Started by कदम, May 22, 2017, 12:07:52 PM

Previous topic - Next topic

कदम


निघाले बाप्पा स्वगृही
दहा दिवसांची करून
सोबत भक्तांची उत्साही
निघाले बाप्पा स्वगृही...

जमा जाहले भक्त
विसर्जना भक्तिभावाने
पुढचा वर्षी लवकर या
दुमदुमला परिसर गजराने..

बाप्पानीही सर्वांना
आश्वासन दिले
येणार लवकर भक्तां
सुखी रहा सांगून निघाले...

भक्तांचा जमला मेळा
लहान थोर जाहले गोळा
आनंदनगरी जाहला सोहळा
बाप्पा निघताना स्वगृही...

गणपती बाप्पा मोरया
पुढचा वर्षी लवकर या....!!!