आता मी एकटाचं जातो समुद्रकिणारी

Started by Rahul Ghorpade, May 22, 2017, 05:25:28 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

आता मी एकटाचं जातो समुद्रकिणारी
शिंपल्यात मोती पाहण्यासाठी
कधी काळी आपण दोघ जायचो समुद्रकिणारी
समुद्राच्या लाटांना भेटण्यासाठी..

आता मी एकटाचं जातो समुद्रकिणारी
एकांतात तुझ्या आठवणीत बसण्यासाठी
कधी काळी आपण दोघ जायचो समुद्रकिणारी
आपल्या प्रेमाचे गीत गाण्यासाठी...

आता मी एकटाचं जातो समुद्रकिणारी
तुझ्या माझ्या हरवलेल्या त्या प्रेमाला शोधण्यासाठी
कधी काळी आपण दोघ जायचो
समुद्राच्या लाटांनी वाहून
आणलेल्या त्या रेतीत खेळण्यासाठी...

आता मी एकटाचं जातो समुद्रकिणारी
शिंपल्यातल्या त्या मोतींना आणी लाटांना विचारण्यासाठी
येती का ती मला बघण्यासाठी
कधी काळी आपण दोघ जायचो समुद्रकिणारी
एकमेकांच्या सुख दुखःला व्यक्त करण्यासाठी...

♡...आता मी एकटाचं जातो समुद्रकिणारी...♡

♥...राहुल घोरपडे...♥